मुंबई : राज्याच्या सामाजिक व राष्ट्रीय विकासात युवकांचे योगदान मोठे आहे. विविध क्षेत्रांत युवकांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राज्य युवा पुरस्कार दिला जातो. सन 2023-24 या वर्षासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असल्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
युवकांमधील नेतृत्वगुण, सामाजिक कार्यातील सक्रियता व नव्या संकल्पनांना चालना देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्था अर्ज करू शकतात. राज्यातील प्रत्येक विभागातून एक युवक, एक युवती व एक संस्था अशा स्वरूपात निवड केली जाणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:
युवक व युवती: रोख रक्कम रु. 50,000/- तसेच सन्मानचिन्ह व गौरवपत्र.
नोंदणीकृत संस्था: रोख रक्कम रु. 100000/- तसेच सन्मानचिन्ह व गौरवपत्र.
गेल्या तीन वर्षांतील कार्यगिरीच्या आधारे अर्जांची तपासणी केली जाईल. अर्ज सादर करताना आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित प्रत, सत्यप्रत प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो यांचा समावेश असावा.
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर,
समता नगर, कांदिवली, मुंबई.
अर्ज सादरीकरणाचे वेळापत्रक: कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00
अधिक माहिती:
https://sports.maharashtra.gov.in किंवा 022-20890717 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
राज्यातील युवक व सामाजिक संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.